परळी तालुक्यातील इंदपवाडी शिवारात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करत त्यांच्या डोळ्यात चक्क पेट्रोल फेकल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकाराप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गोविंद फुलचंद मुंडे यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या इंदपवाडी शिवारातील शेतात जाण्यास आरोपी सोमनाथ मुंडे आणि माणिक मुंडे यांनी विरोध केला. यातून वाद उफाळून आला आणि आरोपींनी थेट गोविंद यांच्या वडिलांना मारहाण केली. या वादादरम्यान संतापलेल्या आरोपींनी त्यांच्याकडील बाटल्यांमधील पेट्रोल गोविंद यांचे मेहुणे मालक असलेल्या चारचाकी गाडीवर ओतले. यावेळी गोविंद अडवण्यासाठी पुढे गेले असता त्यांच्या डोळ्यात पेट्रोल गेले. एवढ्यावरच न थांबता या माथेफिरूंनी गाडीच्या समोरील, मागील आणि दरवाजाच्या काचा तसेच हेडलाईट फोडून मोठे नुकसान केले. त्यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी दहशत माजवली. या हिंसक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.