परळी वैजनाथ: राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील 'आर्यन मोबाईल अँड रिपेअरिंग' या दुकानाचे वरचे पत्रे कापून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९० हजार ९०० रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुकानचालक गणेश दत्ता तोडकरी यांनी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छताचे पत्रे कापून आत प्रवेश केला. दुकानातील दुरुस्ती व विक्रीसाठी ठेवलेला २१ हजार रुपयांचा विवो कंपनीचा आणि ६९ हजार ९०० रुपयांचा ॲपल आयफोन-१४ प्लस असे दोन मोबाईल फोन चोरट्याने लंपास केले. संभाजीनगर (परळी) पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!