अंबाजोगाई (प्रतिनिधी): शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या, गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी 'राजकिशोर मोदी मित्र मंडळा'च्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी या उपक्रमांना सुरुवात होणार असून, यामध्ये नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभरातील कार्यक्रमांचे नियोजन राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमांची सुरुवात सकाळी ठीक ९ वाजून ३० मिनिटांनी श्री योगेश्वरी देवीच्या महाआरतीने होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता चनई येथील हजरत किरमाणी दर्गा येथे चादर अर्पण करण्यात येणार असून, सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी संघर्षभूमी येथे जाऊन मानवंदना दिली जाणार आहे.

रुग्णालयात सामाजिक उपक्रम धार्मिक आणि अभिवादनाच्या कार्यक्रमांनंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये सकाळी ठीक १० वाजून ४५ मिनिटांनी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी रुग्णांसाठी डिस्चार्ज कार्डचे वाटप केले जाईल. या सर्व सामाजिक व धार्मिक उपक्रमांना सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.