केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाने त्याची स्विफ्ट डिझायर कार क्र. (एम एच ११/ बी एच ९३८२) भरधाव वेगात हयगईने व निष्काळजीपणे वाहन चालवून, धाराशिव जिल्ह्यातील मोटार सायकलस्वार अमित नरसिंगे, (रा. जायफळ ता. कळंब) जिल्हा धाराशिव यांच्या मोटरसायकल क्र. (एम एच १२/जे एक्स ३२९०)म ला जोराची धडक दिली. या अपघाता अमित नरसिंगे हा गंभीर जखमी झालेला आहे.
दरम्यान, अपघाता नंतर कारचालक हा त्याच्या ताब्यात असलेल्या वाहनासह पळून जात असताना त्याला साळेगाव येथील माजी उपसरपंच अमर मुळे, सामाजिक कार्यकर्ते जोगदंड आणि लक्ष्मण लांडगे यांनी पाठलाग करून पकडले याची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी पोलीस कॉन्स्टेबल बाबजी दराडे हे हजर झाले.
अमर मुळे आणि लक्ष्मण लांडगे यांनी जखमी अमित नरसिंगे याला उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी घेऊन आले आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!