केज :- केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या स्थानिक डी बी शाखेने टाकलेल्या धाडीत सोरट मटका आणि गुटखा ताब्यात घेतला आहे.
दि. १७ नोव्हेंबर रोजी २:३० वा.च्या सुमारास नांदुरघाट येथील बाजाराकडे जाणारे बाजार तळ ता. केज येथील मोकळया जागेत शिवा दादा शिंदे वय 25 वर्ष (रा. नांदुरघाट पारधी वस्ती ता. केज), दादा चंद्रकांत पवार (रा. रामेश्वरवाडी शिंदे वस्ती ता. केज) युवराज आबासाहेब पवार, (रा. पवारवाडी ता. केज) आणि शाम प्रभु शिंदे (रा. कोल्हेवाडी ता. केज) हे चौघे त्यांच्या स्वतःच्या फायदयासाठी सोरट (चिमनी पाखरे) नावाचा जुगार खेळत आणि खेळवत होते.
याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांच्या डी बी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन वारे, यांनी सदर ठिकाणी धाड टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा १ लाख १ हजार ९८० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या तक्रारी वरून शिवा दादा शिंदे, दादा चंद्रकांत पवार, युवराज आबासाहेब पवार, आणि शाम प्रभु शिंदे या चौघा विरुद्ध गु र नं ७१८/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम १२(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे करीत आहेत.
दरम्यान, दि. १८ नोव्हेंबर रोजी डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल संगीता हनवते, पोलिस कॉस्टेबल नितीन वारे हे शहरात अवैध्य धंद्यावर कारवाई करण्याकामी गस्त घालीत असताना त्यांना माहिती मिळाली की, शहरातील प्रशांत नगर येथे एका पत्र्याच्या शेड मध्ये राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे. ही माहिती मिळताच डिबी पथकाने दुपारी १२:०० वा. च्या सुमारास प्रशांत नगर केज ता. केज जि.बीड येथील इसम सागर बाजीराव चाळक याने त्याचे राहते घराचे मागील बाजुस मोकळ्या जागेत एका लोखंडी पत्र्याच्या खाली विनापरवाना बेकायदेशिररित्या महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु बाबत महाराष्ट्र शासनाने, साठा, विक्री व वाहतुक करणेस प्रतिबंध केलेला सदरचा अन्नपदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने प्रतिबंधीत केलेला मुद्देमाल हा स्वतःचा आर्थीक फायदा करण्यासाठी ताब्यात बाळगुन विक्री करण्यासाठी साठा केला केल्याचे आढळून आले. पोलिसांनी ११ हजार ८०५ रु. चा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांच्या फिर्यादी वरून सागर बाजीराव चाळक याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. १२३, २७४,२७५,२२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!