मुंबई : पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात सात हजार रुपयांची वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र व्हेटर्नरी स्टुडंट्स असोसिएशनने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज रामटेक निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा दरमहा निर्वाह भत्ता अकरा हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. विद्यार्थ्यांनी मंत्रालयात केलेल्या मागणीची दखल घेत मुंडे यांनी हा विषय मंत्रिमंडळात मांडला होता. गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या मागणीला या निर्णयामुळे न्याय मिळून मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष दिनेश रत्नपारखी यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!