अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता अत्यंत उत्साहात आणि विधिवत पूजाअर्चा करून संपन्न झाला.

कारखान्याचे विद्यमान संचालक मधुकर विश्वंभर शेरेकर व सौ. सत्यशीला मधुकरराव शेरेकर यांच्या शुभहस्ते बॉयलरची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन रमेशराव बाबुरावजी आडसकर आणि व्हाईस चेअरमन दत्तात्रय (आबा) ज्ञानोबारावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास कारखान्याचे सर्व संचालक ॲड. प्रमोद चंद्रकांतराव जाधव, ऋषिकेश प्रकाशराव आडसकर, लक्ष्मीकांत महादेवराव लाड, संभाजी बबुवान इंगळे, गोविंद बालासाहेब देशमुख, राजाभाऊ भगवानराव औताडे, बाळासाहेब यशवंत साळुंके, मधुकर विश्वंभर शेरेकर, अनिल शिवाजीराव किर्दत, जीवन रामराव कदम, ॲड. लालासाहेब बाळासाहेब जगताप, शशिकांत गोपीनाथराव लोमटे, मिनाज युसूफखाँ पठाण, अनंत भगवानराव कातळे, विठ्ठल संभासाहेब देशमुख, रमाकांत बाळासाहेब पिंगळे आणि श्रीमती भागीरथीबाई बंकटराव साखरे आदी उपस्थित होते.

अधिकारी व शेतकऱ्यांचा मोठा सहभाग तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय नाथा मरकड, सचिव सुरेश बंकटराव साखरे, चीफ केमिस्ट संतोष देशमुख, डेप्युटी चीफ इंजिनीयर सुशांत येवले, इलेक्ट्रिक इंजिनिअर संदिपान माने, डिस्टिलरी इन्चार्ज प्रकाश साळुंखे, शेतकी अधिकारी रावसाहेब आडे यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड ठेकेदार, ट्रॅक्टर व हार्वेस्टर मालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून आगामी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.