केज :- केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे रात्रीच्या वेळी सात जणांचे घरफोडी झाली असून त्यात २ लाख ७७ हजार रु. चे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.
केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील ओम बाबुराव खरबड हे युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक म्हणून कार्यरत आहेत. दि. १५ नोव्हेंबर रोजी ते रात्र पाळीवर कामाला गेले होते. त्या नंतर दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ओम खरबड, लक्ष्मी बापू वैरागे, महादेव गणपती बोरगे, संदीप भगवान जोशी, संदिप भगवान जोशी, जयपाल बाबुराव सुर्यवंशी,
महादेव संभाजी इंगळे या सात जणांचे घराचे कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
ओम खरबड यांच्या घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे झुंबर, गंठण, चांदीचे कडे आणि रोख ३५००, तर लक्ष्मी वैरागे यांचे सोन्याचे मणी, डोरले, गुंड, चांदीचे कडे आणि १ लाख २० हजार रु. रोख. तर महादेव बोरगे यांच्या घरातून ९ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि रोख १२ हजार रु, तसेच वनमाला सोंदने यांच्या घरातून सोन्याचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, त्याचा बरोबर संदिप भगवान जोशी, जयपाल बाबुराव सुर्यवंशी, महादेव संभाजी इंगळे यांच्या घरी सुद्धा ही घरफोडी झाली आहे.
ओम खरबड यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गु र नं ३४०/२०२६ भा न्या सं ३०५, ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सीताराम डोंगरे हे तपास करीत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!