परळी ते सिरसाळा जाणाऱ्या महामार्गावर कावळ्याचीवाडी फाट्याजवळ भरधाव मारुती वॅगनआर कारने दिलेल्या भीषण धडकेत एका २१ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना १ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
गाढेपिंपळगाव येथील इरफान इसामोद्दीन शेख हा तरुण आपल्या मोटारसायकलवरून गावाकडे जात होता. यावेळी परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनआर कारच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की इरफान हवेत उडून रस्त्यावर आदळला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सिरसाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!