वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे पैशांच्या मागणीवरून जन्मदात्या मुलानेच ५५ वर्षीय आईच्या डोक्यात लोखंडी गज मारून तिला गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

द्रोपदीबाई राजाभाऊ खळगे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा रामकिसन याने त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. वाद वाढल्याने त्याने आईला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. निर्दयीपणाचा कळस गाठत त्याने आईच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केले व जिवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी वडवणी पोलीस ठाण्यात या निर्दयी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ढोबळे करत आहेत.