बीडमधील बालेपीर परिसरातील हिदायत कॉलनीमध्ये जुन्या प्रकरणाच्या रागातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. काच, लाकडी काठी आणि मिरची पावडरचा वापर करून मारहाण करत मुलीचे अपहरण करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दिलशाद युसूफ शेख यांच्या फिर्यादीनुसार, शमा शेख, रेश्मा शेख, शिकंदर शेख आणि सद्दाम शेख यांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी सद्दाम याने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. यापूर्वी त्याने फिर्यादीच्या नणदेचा पाठलाग करून विनयभंग केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस उपनिरीक्षक कुरेशी पुढील तपास करत आहेत.