बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नंदपूर येथे महावितरण कंपनीचे ३० हजार रुपये किमतीचे विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड ते पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नंदपूर येथे महावितरणच्या वतीने २५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेज विद्युत रोहित्र (डीटीसी कोड २५३४६२६) बसवण्यात आले होते. हे ३० हजार रुपये किमतीचे जुने रोहित्र अज्ञाताने चोरून नेले. याप्रकरणी महावितरणच्या सिरसदेवी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ आशुबा विठोबा जगताप यांनी ३ नोव्हेंबर रोजी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तलवडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!