अंबाजोगाई-अहमदपूर मार्गावर घाटनांदूर येथील राजश्री बिअरबारसमोर भरधाव पिकअपच्या धडकेत ३६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शामसुंदर मोहन गित्ते (रा. तळणी, ता. अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२० वाजेच्या सुमारास घडली.
शामसुंदर गित्ते हे दुचाकीवरून जात असताना भरधाव पिकअपने (MH-44 U-4827) त्यांना समोरून जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र, अपघातानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता निर्दयी चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला, ज्यामुळे शामसुंदर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ दयानंद गित्ते यांच्या फिर्यादीवरून ३ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!