लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथे 'तू आमच्या गावाला का आलास?' अशी कुरापत काढून एका तरुणाच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली. तसेच, 'पुन्हा गावात दिसलास तर तलवारीने जिवे मारू' अशी धमकी दिल्याने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक मुंजाभाऊ कटारे (रा. दिंद्रूड) हे त्यांच्या वहिनीच्या घरासमोर थांबले असताना आरोपी संतोष दत्तात्रेय जगताप आणि दिपाली संतोष जगताप (रा. लोखंडी सावरगाव) यांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली. संतोषने अशोक यांच्या डोक्यात वीट मारून त्यांना जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अशोक कटारे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार घोळवे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!