आष्टी ते अहिल्यानगर मार्गावरील कडा कारखाना शिवारात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ७३ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शकुंतला नामदेव पिसाळ असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शकुंतला पिसाळ किराणा आणण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकी (MH2BQ0916) चालक सुरज संजय गदादे याने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मयताचा मुलगा अशोक पिसाळ यांच्या फिर्यादीवरून ३ नोव्हेंबर रोजी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!