बीड जिल्ह्यातील बहुचर्चित कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी व सनदी अधिकारी अविनाश पाठक यांना अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती घोडेस्वार यांच्या पीठाने बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत त्यांना मोठा दिलासा दिला.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतरही मागील तारखांमध्ये स्वाक्षऱ्या करून लवादाचे आदेश निर्गमित केल्याचा आणि त्यातून मावेजा वाटपात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पाठक यांना मे महिन्यात अटक केली होती. यापूर्वी त्यांचा जामीन अर्ज एकदा फेटाळण्यात आला होता; मात्र आता या प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने पाठक यांच्या वतीने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती, जिथे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!