बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे कोर्टातील दाखल केसेस मागे घेण्यास नकार दिल्यामुळे सख्ख्या भावांनी मिळून कुटुंबावर लोखंडी फावडे आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवला. ही भयानक घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली असून यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
फिर्यादी अंकुश राजाभाऊ गिरे यांच्यावर लहू गिरे, शाम गिरे, जयश्री गिरे आणि उषा गिरे यांनी दबाव आणून कोर्टातील दावे मागे घेण्यास सांगितले. नकार मिळताच आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तुडवून लहू गिरे याने हातातील लोखंडी फावड्याने अंकुश यांच्या कमरेवर व पायावर मारहाण केली. त्यानंतर डोक्यात थेट कोयता मारून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. जखमी अंकुश यांच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!