केज - दारात ठेवलेल्या लोखंडी अँगल वरून एकास शिवीगाळ करीत डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना केज शहरात फुलेनगर भागात घडली. या प्रकरणी दोघा मायलेका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

केज शहरातील फुलेनगर भागातील गणेश नागू शिंदे (वय ३२) यांनी घराच्या दारात लोखंडी अँगल ठेवल्या वरून २५ नोव्हेंबर रोजी रात्री ७.४५ वाजेच्या कलावती बाबासाहेब घुले, गणेश बाबासाहेब घुले (दोन्ही रा. फुलेनगर) या दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत गणेश घुले याने दगड गणेश शिंदे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. अशी तक्रार गणेश शिंदे यांनी दिल्यावरून कलावती घुले, गणेश घुले या दोघा मायलेकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार कविता गायकवाड या तपास करीत आहेत.