केज पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबरच्या रात्री तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार झोंबाझोंबी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेला महादेव आघाव आणि पाठोपाठ आलेल्या अर्चना आघाव व इतर दोन महिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात महादेवने थेट पोलिसांचीच खुर्ची उचलून अर्चनाच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी वेळीच ती खुर्ची हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे यांच्या फिर्यादीवरून चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्यातच तक्रारदारांची हाणामारी; थेट पोलिसांची खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न, चौघांवर गुन्हा
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!