केज:- आमच्या अवैध्य गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना दिल्या मुळे त्यांनी धाड टाकली असल्याच्या संशया वरून अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांनी भरदिवसा घरात घुसून एका कुटुंबातील नवरा बायकोला लोखंडी पाईपने मारहाण करून दहशत निर्माण केली आहे. 

दि. १८ नोव्हेंबर रोजी केज शहरातील प्रशांत नगर केज ता केज जि बीड येथे दुपारी १२:३० च्या सुमारास अवैद्य गुटखा विक्री करीत असलेल्या, सागर बाजीराव चाळक, आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एक अनोळखी इसम (सर्व रा. प्रशांत नगर केज) यांनी त्यांच्या अवैद्य व चोरट्या गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशया वरून सुरेश कन्नमवार यांच्या घरात घुसून लोखंडी पाईप व दगडाने मारहाण केली. सागर चाळक हा सुरेश कन्नमवार यांना म्हणाला की, "हरामखोरा तु पोलीसांना मी गुटखा विकतो, याची माहीती देवुन माझ्यावर कार्यवाही करायला का लावलीस ? मारा रे याला आणि याची मस्ती जिरवा." असे म्हणुन त्याने हातातील लोखंडी पाईपने सुरेश कन्नमवार यांना मारहाण केली. तर आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एक अनोळखी यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची पत्नी दैवशाला कन्नमवार व सुरेश कन्नमवार या दोघा नवरा बायकोला बहिनीवर लाथा-बुक्यानी व दगडाने मारहाण केली. 

या प्रकरणी दैवशाला कन्नमवार यांच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात सागर बाजीराव चाळक, आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एक अनोळखी इसम या चौघा विरुद्ध गु. र. नं. ७२१/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३३३, ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे करीत आहेत.

दरम्यान, केज पोलिसांच्या डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल संगीता हनवते, पोलिस कॉस्टेबल नितीन वारे यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास प्रशांत नगर, केज येथील सागर बाजीराव चाळक याच्या घराच्या मागील बाजुस मोकळ्या जागेत एका लोखंडी पत्र्याच्या शेड मध्ये राज्यात बंदी असलेल्या गुटखा त्याच्या स्वतःचा आर्थीक फायदा करण्यासाठी ताब्यात बाळगुन विक्री करण्यासाठी साठा केला केल्याचे आढळून आले होते. त्यावरून पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाईत ११ हजार ८०५ रु. चा मुद्देमाल जप्त केला होता. 

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांच्या फिर्यादी वरून सागर बाजीराव चाळक याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. न. ७२०/२०२६ भा. न्या. सं. १२३, २७४,२७५, २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.