बीड- तळेगावकडून नगर रोडवरून बीड शहराच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव हायवा टिपर चालकाने राँग साईडने गाडी चालवून एका दुचाकीला चिरडले.सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून मुलाला किरकोळ मार लागला आहे.

चऱ्हाटा फाटा परिसरातील उबाळे पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या थरारक अपघातानंतर मुजोर हायवा चालक मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून थेट पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरील नागरिकांचा थरकाप उडाला. तळेगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या हायवा टिपरने (क्रमांक एमएच ४८ बीएम ९३३३) समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच २३ बीएल २०१५) चिरडले. हायवा चालकाच्या या जीवघेण्या निष्काळजीपणामुळे दुचाकी (स्कुटी) थेट चाकाखाली जाऊन तिचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून मुलाला किरकोळ मार लागला आहे.