केज:- केज तालुक्यातून एका सालगाड्याच्या अविवाहित मुलीचे अज्ञात व्यतीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक कुटुंब हे मागील तीन महिन्या पासून केज तालुक्यातील महादू गायकवाड यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत आहे. सालगाड्याच्या सोबत त्यांची पत्नी, सून, लहान मुलगा आणि एक मुलगी सोबत आहे.
दरम्यान, दि. २४ ऑक्टोबर रोजी त्यांचे कुटुंब रात्री जेवण करून झोपले होते. त्या नंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास सालगड्याने झोपेतून उठून पाहिले असता त्याची मुलगी घरात नसल्याने त्यांनी तिचा शोध घेतला असता आढळून आली नाही. तिचे वय २१ वर्षे, रंग-सावळा, उंची ५ फुट, अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी टॉप व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, तिचे शिक्षण इयत्ता ९ वी पर्यंत झालेली असून तिला मराठी भाषा बोलता येते.
तिच्या वडिलांनी dतक्रारी वरून तिचे अज्ञात व्यक्तीन अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६८१/२०२६ भा न्या सं. १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण हे तपास करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!