पाटोदा तालुक्यातील बेलेवाडी शिवारात रात्रीच्या अंधारात शेतातील चाऱ्याचे बुचाड पेटवून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काकाजी चंद्रभान पावसे यांच्या माथाड व लवन शेतातील चाऱ्याचे बुचाड गावातीलच विकास नागू पावसे आणि प्रकाश नागू पावसे यांनी जाणूनबुजून जाळून खाक केले. सकाळी शेतात पाहणी केल्यावर जळालेल्या अवस्थेत चारा पाहून शेतकऱ्याला धक्का बसला. काकाजी पावसे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार उबाळे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!