बीड: बीड-पुणे-बीड दैनंदिन रेल्वेसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बीड बसस्थानक ते बीड रेल्वे स्थानक यादरम्यान विशेष बससेवा सुरू करण्यात यावी, यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी गांभीर्याने पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एसटी महामंडळाच्या वरष्ठि अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे.
बीड ते पुणे रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे जल्ह्यिातील प्रवाशांचा प्रवास सुकर झाला असला, तरी रेल्वेच्या रात्रीच्या प्रस्थानाच्या आणि सकाळच्या आगमनाच्या वेळी बसस्थानक ते रेल्वे स्थानक असा प्रवास करण्यासाठी हक्काची आणि वेळेवर बस उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांना विशेषत: महिला, वृद्ध आणि सामानसुमान असलेल्या प्रवाशांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन खा.सोनवणे यांनी या मार्गावर तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. खा.बजरंग सोनवणे यांच्या या आग्रही भूमिकेमुळे एसटी प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर नर्णिय घेतला जाण्याची शक्यता असून, बीडच्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड विभाग, जल्हिाधिकारी यांनाही पत्र दिले आहे.

पत्रातील ठळक मुद्दे
बसफेऱ्या: बीड बसस्थानक ते बीड रेल्वे स्थानक आणि बीड रेल्वे स्थानक ते बीड बसस्थानक अशी विशेष बसफेऱ्यांची आखणी करावी.
वेळापत्रकाचा समन्वय: रेल्वेच्या वेळांशी ताळमेळ बसवून, प्रवाशांना गाडी सुटण्याच्या आधी आणि पोहचल्यानंतर बस उपलब्ध होईल असे वेळापत्रक आखावे.
तातडीची कार्यवाही: प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित एसटी प्रशासनाला तात्काळ योग्य ते नर्दिेश देण्यात यावेत.

बीड-पुणे रेल्वेमुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे, मात्र रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी हवी ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे एसटी प्रशासनाने रेल्वेच्या वेळांशी समन्वय साधून ही विशेष बससेवा तातडीने सुरू करावी यासाठी पाठपुरावा करत आहे.
—खा.बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदारसंघ.