पाटोदा तालुक्यातील डागाचीवाडी येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी मिळून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात बाळू बापू मिसाळ हे जखमी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंकुशनगर येथे राहणारे रावसाहेब बापू मिसाळ, आदिनाथ रावसाहेब मिसाळ आणि अशोक रावसाहेब मिसाळ यांनी संगनमत करून बाळू मिसाळ यांना गाठले. जमिनीच्या वाटणीचा जुना वाद उकरून काढून त्यांनी काठी, दगड आणि चपलांनी तोंडावर व पाठीवर मारहाण करत मुक्का मार दिला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिन्ही नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार सुंबरे तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!