अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी शिवारात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या पोलवर जोरदार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय प्रकाश कानडे (वय २९, रा. उपळाई रोड, बार्शी) हा आपल्या दुचाकीवरून जात असताना वरवटी शिवारात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील गाडी थेट रस्त्याकडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात अक्षय गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचा भाऊ अजय कानडे याच्या जबाबावरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!