अंबाजोगाई : विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शाळेत नियमित उपस्थित राहता यावे. शालेय स्तरावर स्वच्छता, वाचनसंस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने दीड लाख रुपये किमतीच्या शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम श्री मुकुंदराज विद्यालय, अंबाजोगाई येथे झाला.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या सी.एस. आर. ग्रँट अंतर्गत, रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या सहकार्याने तसेच स्वाती हेरकळ आणि तत्कालीन प्रांतपाल सुधीर लातूरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. क्लबच्या तत्कालीन अध्यक्ष रोहिणी पाठक यांनी , राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन शाळांना अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, राडी आणि मुकुंदराज विद्यालय, अंबाजोगाई येथील प्रत्येकी पाच गरजू विद्यार्थिनींना अशा एकूण दहा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, पट्टी वडगाव आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सुगाव येथे हँडवॉश स्टेशन उपलब्ध करून देण्यात आले. तसेच या शाळांसाठी लायब्ररी कपाटे उपलब्ध करून देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करता यावी, यासाठी कंपोस्टिंग बॅरलचे वितरण करण्यात आले.
या वेळी माजी प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे, रवींद्र बनकर, अमित वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष शकील शेख,माजी अध्यक्षा रोहिणी पाठक, संतोष मोहिते, धनराज सोळंकी, प्रा. अजय पाठक, सचिव राधेश्याम लोहिया, प्रवीण चोकडा, मोईन शेख, राजेंद्र घोडके, रुपेश रामावत , आणि स्वप्निल परदेशी यांची उपस्थिती होती.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!