महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील पदांवर दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण सुनिश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 'दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६' मधील कलम ३३ नुसार गृहनिर्माण विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून म्हाडातील स्थापत्य, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, वास्तूशास्त्रज्ञ, प्रशासकीय, विधी आणि लेखा अशा विविध संवर्गातील पदांसाठी दिव्यांगांची शारीरिक पात्रता व प्रवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय बदलत्या तंत्रज्ञानानुसार दिव्यांगांना आवश्यक ती सहायक उपकरणे आणि कार्यालयीन सुलभता उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दर तीन वर्षांनी या पदसुनिश्चितीचा आढावा घेणे आता बंधनकारक असणार आहे.