कडा येथील अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या दांपत्याला लिंबोडी फाट्याजवळ अडवून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली. जुन्या वादातून हा प्रकार घडला असून आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी रुक्साना जमीर शेख (रा. पाथर्डी) व त्यांचे पती दुचाकीवरून जात असताना आरोपी वाजीद नियमत सय्यद (रा. पाटोदा) याने गाडी अडवली. 'पेन ड्राईव्ह द्या, नाहीतर जिवे मारीन' अशी धमकी देत त्याने दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. ३० ऑक्टोबरला याप्रकरणी वाजीदविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सवासे करत आहेत.