अंबाजोगाई: "माणूस आयुष्यभर देहाचे लाड करतो. पण देहात बसलेल्या आत्म्याकडे कधी पाहतच नाही. असे अध्यात्मिक सत्य ह.भ.प. श्रीरामबुवा रामदासी (बिटरगांवकर) महाराजांनी झालेल्या कीर्तनातून भाविकांना समजावून सांगितले.

येथील ब्राम्हण संघटन यांच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात तिसरे पुष्प गुंफताना ह.भ.प. श्रीरामबुवा रामदासी (बिटरगांवकर) महाराज बोलत होते. त्यांनी आपल्या कीर्तनात

संत वेण्णास्वामींच्या "बंध विमोचन राम माझा" या अभंगावर निरूपण करताना त्यांनी अध्यात्म म्हणजे काय, याची सोप्या भाषेत उकल केली.

अहंकार सोडा, आत्मारामाला भेटा. हि वेण्णास्वामींच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण त्यांनी सांगितली. आपण शरीर नाही, मन नाही, आपण त्या दोहोंना चालवणारा आत्माराम आहोत. जोपर्यंत 'मी' पणाचा अहंकार आहे, तोपर्यंत बंधन आहे.सद्गुरू कृपया ओळखीला डोळस डोळ्यांना आरसा लागतो.तसा आत्म्याला ओळखण्यासाठी सद्गुरू लागतो. ग्रंथ वाचून ज्ञान मिळेल, पण आत्मज्ञान गुरुकृपेनेच मिळते.असे त्यांनी सांगितले.

या कीर्तनात तबल्यावर केदार दामोशन यांनी तर हार्मोनियम वर विश्वजित धाट यांनी साथसंगत केली.