केज :- केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मांजरा नदी काठावरील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींचे वायर चोरट्यांनी कापून नेले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र या चोरीची तक्रार अद्याप पर्यंत शेतकऱ्यांनी दाखल केली नसल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे.

मांजरा नदी काठच्या ५० शेतकऱ्यांच्या सुर्डी गावच्या विद्युत मोटर वायरची चोरी झाल्याने  दुष्काळात शेतकऱ्यावरती चोरांचे संकट आले असल्याची माहिती जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विद्युत वायर चोरीचा तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की,

पावसा अभावी मांजरा धरण कोरडे टाक पडले असून मांजरा धरणतून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत  मोटरचे कनेक्शन विद्युत वितरण कंपनीने एक  महिन्या पूर्वी बंद केले आहेत. त्यामुळे  मांजरा धरणावरती आधारित शेती ऊस पिक गेली एक महिन्या पासून तग धरून आहेत. मात्र पाऊस पडेल आणि धरण भरेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी व वायर जरी कनेक्शन कट केले तरी नदी पत्रात ठेवलेले आहेत.   पाऊस झालाच नाही. याचा दुष्काळाचा फायदा घेत चोर आणि  दि. २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तेलेवाडी ते सुर्डी मांजरा धरणा अंतर्गतच्या शेतकऱ्यांच्या ५० मोटारचे वायर कापुन चोरी करण्यात आले. त्याचा तपास करण्याची मागणी जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे, दत्ता भिसे, लालासाहेब  भिसे यांनी केली आहे.

पोलिसात तक्रारच दाखल नाही मग तपास लागणार कसा ? :- सबंधित शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे वायर चोरीला गेले असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र त्या बाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

एक महिन्यापूर्वी महसूल प्रशासनाची कारवाई :- या वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे मांजरा धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन बंद करण्यासाठी महसूल प्रशासन, वीज वितरण आणि मांजरा प्रकल्प प्रशासन यांनी शासनाच्या आदेशा नुसार कारवाई करून वीज पुरवठा बंद करून विद्युत पंप जप्त केले आहेत.