केज :- केज येथे मेन रोड लगत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या जवळ एका पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते त्याचा तपास लागला असून सदर मयत हा लातूर येथील असून त्याची ओळख पटली आहे.

दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास केज येथील मेन रोड लगत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात रस्त्याच्या कडेला अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, शिवाजी कागदे, बाबजी दराडे, बजरंग मुंडे हे घटनास्थळी हजर झाले. त्या नंंतर १०८ रुग्णवाहिकेचे पायलट मकरंद घुले आणि डॉ. सूर्यवंशी यांनी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृतदेह शवागारात ठेवला होता.

दरम्यान पोलिसांनी सदर अज्ञात व्यतीचा तपास घेतला असता तो मयत शाहरुख प्र पाशामियाँ शेख असून तो हिमायत नगर लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून शवविच्छेदना नंतर त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नाही.