पाटोदा तालुक्यातील घोगसवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाबासाहेब विठ्ठल दहिफळे (५६, व्यवसाय शेती, रा. घोगसवाडी, ता. पाटोदा) यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरीला नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ९० हजार ११० रुपये असल्याचे नमूद आहे.