बीड तालुक्यातील वरवटी येथे रस्त्यात भुसकट आणि काटे का टाकले असा जाब विचारणाऱ्या प्लंबर तरुणावर शेजाऱ्यांनी लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात संतोष जयवंत कोठुळे हे जखमी झाले आहेत.

संतोष कोठुळे यांनी रस्त्यावरील अडथळ्याबाबत विचारणा केली असता निलेश भास्कर कोठुळे, राहुल भास्कर कोठुळे, विजयमाला कोठुळे आणि सारिका कोठुळे यांनी वाद घातला. निलेशने लोखंडी पहार आणून संतोष यांच्या डाव्या पायावर मारली, तर राहुलने काठीने उजव्या पायावर वार करून जखमी केले. मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारालाही महिला आरोपींनी मारहाण केली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चारही आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.