बीड: उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून दोन भावांनी एका तरुणास रस्त्यावर पाडून लाकडाने बेदम मारहाण केल्याची घटना बीड शहरातील रिपोर्टर भवन परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सतीश राजेंद्र झाडे (वय २७, रा. लक्ष्मणनगर, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपींना उसने पैसे दिले होते. ते पैसे परत मागितल्याचा राग धरून आरोपी सागर संजय थोरात आणि लखन संजय थोरात यांनी सतीश यांना घरासमोरील रस्त्यावर अडवले. दोघांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ करत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांसह लाकडाने डोक्यात मारून जखमी केले. बीड शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सय्यद तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!