परळी तालुक्यातील सेलू शिवारात गट क्रमांक १५३ मधील शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटार आणि केबल वायर अज्ञात चोराने लांबविल्याची घटना समोर आली आहे. तेरा ऑक्टोबरच्या सायंकाळपासून पंधरा ऑक्टोबरच्या सकाळदरम्यान ही चोरी घडली असून शेतकरी मदनराव सोनाजी मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मदनराव मोरे यांनी पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत तीन हॉर्सपॉवरची फाल्कन कंपनीची मोटार आणि ४०० फूट लांब केबल वायर बसवली होती. अज्ञात चोराने विहिरीतून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे हे साहित्य चोरून नेले. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!