परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात एका तरुणाला विनाकारण शिवीगाळ करत त्याच्यावर कोयता आणि विटेने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास श्रीराम केंद्रे यांच्या दुकानासमोर हा प्रकार घडला असून, परळी शहर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हरीश कोंडीराम चव्हाण (वय २४) हा तरुण दुकानासमोर उभा असताना आरोपी विशाल खांडेकर, शिवम वाघमारे, सोमनाथ कलमे, आदित्य लोंढे, वैभव आणि शिवाजी खांडेकर (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून त्याला घेरले. 'तू आम्हाला शिवीगाळ का करतोस' असा जाब विचारत आरोपींनी त्याच्या डोक्यावर, नाकावर आणि पायाच्या बोटांवर हातातील कोयत्याने आणि विटेने सपासप वार करून रक्तबंबाळ केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहाय्यक फौजदार सौंदनकर पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!