केज :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शेतात आग लागून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत केज येथील शेतकऱ्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली तर दुसऱ्या घटनेत विजेच्या तारांचा एकमेकांना घर्षण झाल्याने ठिणगी पडून शेतकऱ्याचा ऊस जळाला आहे.
दि. २३ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील
रात्री केज येथील शफीक महेमूद यांच्या केज येथून जाणाऱ्या जुन्या टाकळी रस्त्या लगत असलेल्या दोन एकर शेतातील सोयाबीन कापणी करून मळणीसाठी शेतात गंज लावून ठेवले असताना रात्री अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून पेटवून दिले. या शेतकऱ्याचे पूर्णतः सोयाबीन जळून नुकसान झाले. तर मांगवडगांव येथील अमोल उत्तरेश्वर जाधवर यांच्या गट नं १३३ मधील ऊस असून दि. २३ ऑक्टोबर रोजी उसाच्या शेतातून गेलेल्या खांबावरील वीजवाहक सैल असलेल्या तारा एकमेकींना चिटकून झालेल्या घर्षणाने स्पार्किंग झाल्याने ठिणगी पडून एक एकर ऊस जळून खाक झाला आहे.
या दोन्ही जलिताच्या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!