परळी वैजनाथ तालुक्यातील जिरेवाडी शिवारात बायपास रस्त्यावरील हॉटेल आनंद येथे जेवणासाठी गेलेल्या एका तरुणावर जुन्या वादातून फुटलेल्या काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंधरा ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून अविनाश भास्कर नागरगोजे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

अविनाश हा आपल्या मित्रासोबत हॉटेलवर जेवत असताना आरोपी राजेश आत्माराम मुंडे तेथे आला. 'तू माझ्या चुलत भावासोबत भांडण का केलेस' अशी कुरापत काढून त्याने शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने फुटलेली काचेची बाटली अविनाशच्या उजव्या गालावर आणि पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले. अविनाशच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.