बीड जिल्ह्यात वाढती अवैध सावकारी आणि 'शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' मधील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. नागरिक व शेतकरी आपल्या समस्या ९३०७३२५५८६ या २४ तास सुरू असणाऱ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर लेखी स्वरूपात नोंदवू शकतात.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार, सक्तीची वसुली करणाऱ्या अवैध सावकार आणि फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, कर्जमुक्तीसाठी प्रलंबित असलेले आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांनी त्वरित पूर्ण करावे. कर्जमाफी मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी तत्काळ नवीन पीक कर्ज द्यावे, अन्यथा संबंधित बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.