केज :- केज तालुक्यातील नाव्होली शिवारात एका ५५ वर्षीय इसमाचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
कापरेवाडी ता. केज येथील बाळासाहेब भीमराव कापरे वय (५५ वर्ष) २२ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते. ते नांदूरघाट रस्त्यावरील नाव्होली शिवारात हॉटेलकडे गेले होते. तीन दिवसा पासून घराबाहेर गेलेले बाळासाहेब कापरे हे घरी नव्हते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन ते आढळून आले नाहीत. दि. २५ नोव्हेंबर बुधवार, रोजी नाव्होली येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर, हेडकॉस्टेबल राजू वंजारे, पोलीस नाईक गोविंद मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला.
बाळासाहेब कापरे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट कळू शकलेले नाही, मात्र ते विहिरीत उतरत असताना ते पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत.
ल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार बाबासाहेब बांगर, जमादार राजू वंजारे, पोलीस नाईक गोविंद मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!