नेकनूर: सामायिक कर्जाचे पैसे फेडण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादात एका दांपत्याला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सानपवाडी येथे घडली.
फिर्यादी सीताबाई दिलीप गीते (वय ४५, रा. सानपवाडी) आणि त्यांचे पती घरासमोर असताना आरोपी प्रकाश रावसाहेब गीते व सुरेखा प्रकाश गीते यांनी त्यांना गाठले. "तुम्ही एकत्र घेतलेल्या कर्जाचे पैसे का देत नाही?" असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रकाश गीते याने काठीने पतीच्या हातावर, पाठीवर आणि पायावर जबर मारहाण केली. तसेच सीताबाई यांनाही काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!