केज :- घरा जवळ खेळत असलेल्या इयत्ता ७वी च्या मुलीला साप चावल्याने तिचा उपचारासाठी नेत वाटेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील गौरवाडी येथे मंगळवार, दि. १३ सायंकाळी घडली. 

केज तालुक्यातील गौरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकत असलेली सुप्रिया बाबरू घाडगे ही मुलगी शिक्षण घेत होती. मंगळवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्या नंतर ती सायंकाळी ६:०० वा.च्या सुमारास घराजवळ खेळत असताना सुप्रियाला साप चावला. त्या नंतर तिला नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. मात्र गावातून वाहनांची सोय नसल्याने तिला उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वडिलांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन
सर्प दशांने मरण पावलेल्या सुप्रियाचे वडील बाबरू घाडगे यांचे दोन वर्षा पूर्वी अपघाती निधन झाले होते. तिची आई ऊसतोडणी करून पाच मुली व एक मुलाचे संगोपन करीत आहे. तिची आई ही उसतोडणीसाठी साखर कारखान्याला जाण्याच्या तयारीत असतानाच मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सुप्रिया ही वेळेवर उपचारासाठी नेता आले नाही.