बीड शहरातील शिंदेनगर फेज ३ भागात भररात्री बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन महागडे मोबाईल फोन लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. शिंदेनगर भागात राहणारे शिक्षक आशुतोष नाथ चौबे हे ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पत्नीसह घरात झोपलेले होते. अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये चार्जिंगला लावलेले विवो आणि सॅमसंग कंपनीचे एकूण २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून चोरटा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर आशुतोष चौबे यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस हवालदार मुंडे या चोरीचा पुढील तपास करत आहेत.
बीडच्या शिंदेनगरात शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
गॅलरीचा कडी-कोंडा तोडून दोन महागडे मोबाईल लंपास
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!