बीड शहरातील जुना मोंढा भागात भरदिवसा एका व्यापाऱ्याच्या पिकअप वाहनातून २ लाख १८ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. किराणा दुकानाचे सामान भरण्यासाठी नदीम इसाक बागवान हे कॅश बॅग घेऊन पिकअप वाहनाने (एमएच ४४ यु ४६४९) आले होते. दुकानातून माल खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने वाहनाच्या क्लीनर बाजूच्या खिडकीतून हात घालून सीटवर ठेवलेली कॅश बॅग चोरून नेली. या प्रकरणी नदीम बागवान यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या जुना मोंढ्यात भरदिवसा पिकअपमधून सव्वादोन लाखांची रोकड चोरीला
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!