अंबाजोगाई - पुढील खरीप हंगामा करिता शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रवि मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (एनडीकेएसपी) अंतर्गत वरवटी येथे सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेऊन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी दर्जेदार सोयाबीन बियाणे निर्मितीसाठी शेतकऱ्यांना बुरशीजन्य रोगग्रस्त झाडांची निरीक्षणे दाखवून काढणी करताना रोगग्रस्त व हिरवी, पाण्या किंवा चिखलामध्ये बुडून खराब झालेले झाडे निवडू नयेत, दोन वेगवेगळ्या जातींचे सोयाबीनचे ढीग वेगवेगळे करणे, सोयाबीन काढणी करताना झाड उपटून घेतल्यामुळे मुळांना माती चिटकून येते त्यामुळे शेतमालामध्ये मातीचे प्रमाण वाढून भाव कमी मिळतो त्यामुळे काढणी करताना व्यवस्थित विळ्याच्या साह्याने सोयाबीनचे झाड कापून घ्यावे. मळणी करताना बियाणे फुटू नये यासाठी मळणी यंत्राची गती ३०० ते ३५० फिरे प्रतिमिनिट ठेवावी, बियाणे उन्हामध्ये वाळवून ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा कमी करून सुतळी पोत्यांमध्ये हवेशीर जागेत ठेवावे. थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच ठेवू नये याची माहिती दिली. तसेच ठिबक व तुषार सिंचनासाठी आगाऊ अनुदान पद्धतीबाबत माहिती देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करून दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व स्पष्ट केले. संच खरेदीसाठी सुरुवातीला मोठी रक्कम उभी करण्याची अडचण दूर करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना केंद्रीय बँक डिजिटल चलनाच्या (सीबीडीसी) माध्यमातून डिजिटल टोकन क्यूआर कोड स्वरूपात अनुदान उपलब्ध होणार आहे. सदर अनुदानाचा वापर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सिंचन संच खरेदीसाठी करता येईल बाबत माहिती येळकर यांनी दिली. यावेळी संजीव ढाकणे, विठ्ठलराव उघडे, नितीन उघडे, कृष्णा उघडे, सर्जेराव उघडे, भक्तराम उघडे, शिवकन्याबाई उघडे, रेखा उघडे, स्वाती उघडे, सविता उघडे, रूपाली उघडे, गोपाळ जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
वरवटी येथे सोयाबीन कापणी, मळणी, साठवणूक प्रशिक्षण
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!