अंबाजोगाई(प्रतिनिधी) - योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि व यो.शि.सं.पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्राचार्य भ.कि. सबनीस यांच्या स्मृति प्रित्यर्थ शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वा. अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेचे विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लोकशाहीचे भविष्य, विकास प्रकल्प विरुद्ध पर्यावरण, फेक न्यूज आणि भारतीय लोकशाही, विकसित भारत २०४७ : युवकांकडून अपेक्षा आणि आव्हाने, रोजगार-शिक्षण आणि युवकांचे राजकारण, तसेच आजच्या भारतात लोकशाही संवादाची आवश्यकता असे आहेत. स्पर्धेत सांघिक गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये, तर वैयक्तिक गटासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये असून, स्पर्धकांचे वय २५ वर्षांपर्यंत असावे. भाषणासाठी ५ अधिक २ मिनिटे वेळ देण्यात येईल. भाषण मराठीतून करणे आवश्यक असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धकांनी महाविद्यालयाचे अनुमतिपत्र, ओळखपत्र व जन्मतारखेचा अधिकृत पुरावा सोबत आणावा. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उद्घाटक म्हणून एन एस ए आय चे संस्थापक अध्यक्ष तथा शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर चे सचिव बी.बी.ठोंबरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी भारत गोचडे उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य पी.एस. एस.कुलकर्णी आहेत. स्पर्धेचे ठिकाण अप्पाजी बाबाजी साहू नागापूरकर सभागृह, योगेश्वरी शिक्षण संस्था परिसर,परळी रोड, अंबाजोगाई असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर,प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख, उपप्राचार्य रमेश सोनटक्के,जितेंद्र देशपांडे व संयोजक प्रा रमेश सोनवळकर वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी प्रा.डॉ. बी.के.भाबरदोडे (७९७२४३४९०३), प्रा.सविता बुरांडे, (९८५०५२०५२३) व प्रा. अभिजीत देशपांडे (७०२०११०३७८) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.