केज:-  केज कळंब रोडवर साळेगाव येथून शेलगाव गांजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका वळणावर मोटार सायकल घसरून डोक्याला मार लागल्याने एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. 

या बाबतची प्राप्त माहिती अशी की, दि. १ ऑक्टोबर रोजी उत्तरेश्वर महादेव उबाळे वय २२ वर्ष हे रात्री ८:३० वा. च्या सुमारास त्यांच्या मोटार सायकलवरून क्र. (एम एच १४ / डी डी८३९०) केजहून निघून साळेगाव, शेलगाव गांजी मार्गे युसुफवडगाव कडे जात होते. त्यावेळी केज ते साळेगाव रस्त्या पासून असलेल्या साळेगाव ( गांजी फाटा) ते शेलगाव गांजी या रस्त्यावर असलेल्या एका वळणावर त्यांची मोटार सायकल घसरून पडले. तयार त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यात झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा. 

त्या नंतर दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० क्या सुमारास शेतात जाणाऱ्या लोकांनी पाहिले आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने पोलिस कॉन्स्टेबल महावीर सोनवणे व बाबजी दराडे हे अपघातस्थळी जाऊन त्यांनी अपघातात जखमी असलेले उत्तरेश्वर उबाळे याचे शव उपजिल्हा रुग्णालयातउत्तरेश्वर उबाळे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनकरण्यात आले. उत्तरेश्वर उबाळे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.

रात्रभर मृतदेह निर्जन स्थळी अंधारात पडून

अपघात झालेले ठिकाण हे अडवळणाचे आणि निर्मनुष्य आहे. रात्री या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या कमी असते. तसेच उत्तरेश्वर हे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडल्याने आणि रात्री अंधार असल्याने त्यांना कुणी पाहिले नाही.

 त्या नंतर दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० क्या सुमारास शेतात जाणाऱ्या लोकांनी पाहिले आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्या नंतर पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने पोलिस कॉन्स्टेबल महावीर सोनवणे व बाबजी दराडे हे अपघातस्थळी जाऊन त्यांनी अपघातात जखमी असलेले उत्तरेश्वर उबाळे याचे शव उपजिल्हा रुग्णालयात हलविले.