आष्टी : तालुक्यातील देवळाली येथील शेतकरी देविदास टकले यांचा दिवाळीच्या पूर्वसंध्येला वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खा.बजरंग सोनवणे यांनी रविवारी देवळाली येथे टकले कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे देवळालीसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खासदार सोनवणे यांनी टकले कुटुंबीयांची विचारपूस करत या कठीण प्रसंगी सर्वतोपरी पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला. देवळाली आणि आसपासच्या शिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असून रात्री-अपरात्री शेतीची कामे करणे कठीण झाले आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने गंभीर दखल घ्यावी, परिसरात दिवसा व रात्रीची गस्त वाढवावी, तसेच पिंजरे लावून या हिंस्र वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना खा. सोनवणे यांनी यावेळी संबंधित वनअधिकाऱ्यांना दिल्या.
वाघाच्या हल्ल्यातील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे खा.बजरंग सोनवणेंकडून सांत्वन
वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून परिसरात गस्त वाढविण्याची वनविभागाला सूचना
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!