अंबेजोगाई: येथील पोदार प्रेप शाळेत 'बिंदू दिन' विविध आनंददायी आणि सर्जनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि कृतीशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या उपक्रमात चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पोदार प्रेपच्या संचालिका डॉ. स्वाती पोपट वात्स यांच्या प्रेरणेने, शाळेचे प्राचार्य कीर्तिकुमार देशमुख, मुख्याध्यापिका मिनाक्षी राठोड आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

वयोगटनिहाय कल्पक उपक्रम

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी वर्गांनुसार वैविध्यपूर्ण उपक्रमांची आखणी करण्यात आली होती. यामध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझी बारी, माझे गुण', ज्युनिअर केपोदार प्रेपमध्ये विविध उपक्रमांनी 'बिंदू दिन' उत्साहात साजरा; पर्यावरणपूरक उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यावरणपूरक पद्धतीवर भर

कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम राबवताना कागदाचा कोणताही अपव्यय टाळण्यात आला. संपूर्ण आयोजन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आल्याने मुलांमध्ये सुरुवातीपासूनच निसर्गाप्रती सजगतेची भावना रुजवण्याचा प्रयत्न झाला. उत्सवाचा निखळ आनंद आणि अनुभवाधारित शिक्षण यांचा सुरेख संगम साधत पोदार प्रेपने हा दिवस अर्थपूर्ण रीतीने साजरा केला.